[ad_1]
Child suffering from Heatstroke: सध्या उन्हाचा पारा 42 अंशावर आहे, लहान मोठ्या सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होतोय मात्र या सगळ्यात आपल्या छोट्यांना सांभाळा कारण उन्हाचा फटका लहानग्यांना सगळ्यात जास्त बसतोय. त्यामुळे दवाखाने सध्या लहानगांच्या तापामुळ हाऊसफुल झालेले आहेत. कशी घ्यायची बाळांची काळजी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाचा पारा चांगला चढलेला आहे. विदर्भात तर काही ठिकाणी पारा 45 पार गेलाय. तर मराठवाड्यात सुद्धा आता 42, 43 अंशापर्यंत ऊन जात आहे. या सगळ्यांचा फटका मोठ्यां सोबत लहान बाळांना बसतोय. गेली काही दिवस लहानग्यांचे दवाखाने हाउसफुल झाले आहेत, मुलांना ताप येतोय ताप 104 पर्यंत जातोय आणि आता यात आठ दिवस जात आहे त्यामुळे आता या मुलांची काळजी घेण्याची गरज आहे.
खास करून थोडे जरी उन्हात फिरल्यास मुलांना ऊनाचा त्रास होऊ लागतंय. डिहायड्रेशन होते इतकच नाही तर ग्रामीण भागात पाण्याची अडचण आहे. त्यामुळे टँकरचे पाणी प्यायलं जातं. यामुळे मुलांमध्ये टायफाईडचं प्रमाणसुद्धा वाढत चाललंय. त्यामुळे पाणी उकळून थंड करून प्या असं आवाहन डॉक्टर करतायेत. तर उन्हाच्या वेळेत मुलांना बाहेर काढू नका, गर्दीच्या ठिकाणी तर अजिबात नेऊ नका असा सल्ला डॉक्टर देतायत.
उन्हाचा फटका बसण्याचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार घामोळ्या येतात. त्यावर उपाय म्हणजे उन्हात न फिरणे आणि औषोधपचार घेणे. सनबर्न म्हणजे अंगावर उष्णतेचे चट्टे येतात.
ऊन लागणे,ताप येणे, शरीरातील पाणी कमी होणे, हृदयाची गती वाढते, रक्तदाब कमी होणे, अशी लक्षणे उन्हाचा फटका बसल्यास जाणवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने भोवळ येऊन मनुष्य पडू शकतो. हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे.
काय काळजी घ्याल?
मुलांना बाहेर नेताना उन्हाची वेळ टाळावी. लहान मुलांनी शक्यतो उन्हात बाहेर पडूच नये. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेसच बाहेर पडावे. सैल आणि सुती कपडे घालावे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नेऊ नये. पाणी भरपूर प्यावे. ग्रामीण भागात पाणी उकळून प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास तातडीने ओआरएस घ्यावे, नारळ पाणी साखर प्यावे.
ऊन लागल्याचे काही गंभीर संकेत
चिंताजनक लक्षण म्हणजे बाळ अतिसुस्त राहणे. बाळाच्या लघवीचे प्रमाण 4 ते 5 वेळापेक्षा कमी होणे. त्याचबरोबर बाळाला चक्कर येणे, बाळ विशेषत स्तनपान करणाऱ्या बाळांना ताप येणे आणि बाळ निस्तेज होणे, टाळू खोल जाणे, हे गंभीर प्रमाण आहे.
डॉक्टरांचा सल्ला
स्तनपान देणाऱ्या मतांनी दूषित पाणी पिऊ नये. यातून बाळांना इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळं काळजी घ्यावी. भरपूर शुद्ध पाणी प्यावे असा सल्ला बालरोग तज्ञ डॉक्टर मंदार देशपांडेनी दिलाय. उन्हाचा पारा वाढलाय. त्यामुळं अनेक आजार तोंड वर काढतायत. त्यामुळं काळजी घ्या आणि ऊन टाळा, असेही ते पुढे सांगतात.
[ad_2]