[ad_1]
Shubman Gill Net Worth: भारतीय क्रिकेटमध्ये 24 मे 2025 पासून ‘शुभमन गिल युग’ अधिकृतपणे सुरू झालं आहे. भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. टेस्ट संघाचं नेतृत्व त्याच्या हाती देण्यात आलं आहे. गिलचा इंग्लंड दौऱ्यासह कॅप्टनसीचा पहिला अध्याय सुरू होणार आहे. 2019 मध्ये टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर शुभमनचा खेळ तर उत्तम झाला. पण त्यासोबतच त्याची कमाई, प्रसिद्धी आणि ब्रँड व्हॅल्यूही वेगानं वाढली आहे. 25 वर्षाच्या शुभमन गिलची कमाई किती आहे?, नेट वर्थ किती आहे हे जाणून घेऊयात…
करिअरसोबतच आर्थिक ग्राफही सातत्याने वर
2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचा प्रमुख सदस्य म्हणून शुभमनचं नाव झळकलं. तेव्हापासून शुभमन गिलचं नाव चर्चेत येऊ लागलं. त्याच वर्षी IPL मध्ये KKR कडून पदार्पण झालं आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड दिसला. 2019 मध्ये वनडे, आणि डिसेंबर 2020 मध्ये MCG वर टेस्ट डेब्यू करताना त्याने आपल्या कारकीर्दीची मोठी झेप घेतली. वर्ल्ड कप फाइनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता. आता तो टेस्ट संघाचं नेतृत्व करणार आहे.
Say Hello to #TeamIndia‘s newest Test Captain @ShubmanGill pic.twitter.com/OkBmNZT5M0
— BCCI (@BCCI) May 24, 2025
IPL आणि BCCI करारातून कोटींची कमाई
आयपीएल (IPL) मध्ये गिलचा पहिला पगार 1.8 कोटी होती. पुढील 4 हंगाम तो ह्याच रकमेसह खेळला. पण गुजरात टायटन्समध्ये 2022 पासून तो 8 कोटींना खेळू लागला. आता संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याची IPL सैलरी 16.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बीसीसीआय (BCCI) च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार गिल यंदा A ग्रेडमध्ये आहे आणि त्याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. प्रत्येक टेस्टसाठी 15 लाख, ODI साठी 6 लाख, आणि T20 साठी 3 लाख रुपये फिक्स मॅच फी मिळते.
MRF सोबत सर्वात मोठी बॅट डील
या क्रिकेटर्सचा कमाईचा एक मोठा स्रोत म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट्स. शुभमन गिल सध्या Gillette, My11Circle, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MRF सारख्या ब्रँड्ससोबत जोडलेला आहे. मार्च 2025 मध्ये MRF ने त्याच्यासोबत 4 वर्षांचा बॅट स्पॉन्सरशिप करार केला आहे. या अंतर्गत त्याला दरवर्षी 8 ते 10 कोटी रुपये मिळतात. ही डील विराट कोहलीनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी बॅट डील मानली जाते.
शुभमन गिलची नेटवर्थ किती आहे?
एकूण कमाईचा विचार केला तर शुभमन गिलची अंदाजे नेटवर्थ 40 ते 50 कोटी रुपयांदरम्यान आहे. अल्पावधीतच तो क्रिकेटच्या मैदानासोबतच जाहिरातींमध्येही हिट झाला आहे.
शुभमनची लाइफस्टाइल
2024 मध्ये मोहालीमध्ये त्याचं स्वतःचं आलिशान बंगला आहे. शिवाय त्याच्याकडे सुमारे 90 लाख रुपये किंमतीची Range Rover Velar SUV देखील आहे.
[ad_2]