[ad_1]
चेन हिसकावणारे आरोपी.
एन-४ भागात वृद्ध महिलेची चेन हिसकावल्यानंतर पुन्हा एक चोरी करण्यास गेलेल्या दोन चोरट्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश संतोष राठोड (२३, रा. मूळ जिंतूर, ह. मु. मुकुंदवाडी) आणि निखिल नयबराव चव्हाण (२२, रा. मंठा, जि. जालना, ह. मु. गणेशनगर,
.
दुचाकीवर बसून दोन चोरटे एन-४ भागातील समृद्धी रेसिडेन्सी येथे एका गल्लीत आले. त्यातील पाठीमागे बसलेला आरोपी फोनवर बोलत पुढे गेला व त्याने लताबाई शिरसाट (६०) यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. त्यानंतर पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वाराने लगेच दुचाकी पुढे घेऊन पळ काढला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याआधारे पुंडलिकनगर पोलिसांनी शोध सुरू केला होता. एका चोरीवर न थांबता आणखी एक चेन स्नॅचिंग करण्यास दोन्ही आरोपी बाहेर पडले होते. उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांना खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. लताबाई शिरसाट यांची सोन्याची पोतदेखील पोलिसांच्या हवाली केली. चिकलठाण्यातही लुटले चिकलठाणा येथील वेअर हाऊसजवळ याच चोरट्यांनी २६ एप्रिल रोजी ७५ वर्षांच्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटले होते. त्या वेळी एक तोळ्याची सोन्याची चेन पळवली होती. आरोपी अंकुश राठोड हा सकाळी वाहने पुसण्याचे काम करतो, तर निखिल चव्हाण हा फरशी बसवण्याचे काम करतो. दोघांकडे महागडी बुलेट, मोपेड आहे.
[ad_2]