[ad_1]
Should You Shower More During Period : प्रत्येक महिलेला महिन्याच्या ठराविक तारखेला मासिक पाळी येते असते. काही महिलांना मासिक पाळीचा खूप त्रास होतो तर काहींना सुरुवातेचा एखाद दिवस त्रास होतो. मासिक पाळी येणे हे महिलेच्या गर्भधारणेशी जोडलं गेलं आहे. मासिक पाळी नियमित असेल तर गर्भधारणेला समस्या येत नाही. पण मासिक पाळी संदर्भात आजच्या तरुणींमध्ये अनेक समस्या जाणवतात. मासिक पाळीचे पाच दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. यात तुम्हाला योग्य स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. या स्वच्छेबद्दल तुमची एक चूक आरोग्यावर परिणाम करते. महिलांना मासिक पाळीच्या काळात एक सामान्य प्रश्न असतो, तो म्हणजे या दिवसांमध्ये नेमकी किती वेळा आंघोळ करावी. आज तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख सल्लागार डॉ. मंजुषा गोयल यांनी निरासन केलं आहे.
मासिक पाळी दरम्यान आंघोळ…
सहसा, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता आणि आराम राखण्यासाठी दिवसातून एकदा आंघोळ ही पुरेसी आहे. जर एखाद्या व्यक्तीला खूप रक्तस्त्राव होत नसेल किंवा खूप घाम येत नसेल तर दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ करण्याची आवश्यकता नसते. पण, जास्त रक्तस्त्राव असलेल्या दिवशी किंवा शारीरिक हालचालींनंतर, संध्याकाळी लवकर आंघोळ केल्याने ताजेतवाने वाटण्यास मदत मिळते. दुर्गंधी किंवा चिडचिड होण्याचा धोका यातून कमी होण्यास मदत मिळते.
योग्य स्वच्छता दिनचर्या
मासिक पाळी दरम्यान एक आदर्श स्वच्छता दिनचर्या म्हणजे दिवसातून एकदा कोमट पाण्याने आंघोळ करणे हे आवश्यक आहे. कोमट पाणी आरामदायी वाटत असले तरी, ते रक्तवाहिन्या पसरवून तात्पुरते रक्त प्रवाह वाढण्यास फायदा होतो. आंघोळ करताना, फक्त बाहेरील गुप्तांग पाण्याने किंवा सौम्य, सुगंध नसलेल्या साबणाने हळूवारपणे स्वच्छ करणे अतिशय गरजेचे आहे. योनीमार्ग स्वतः स्वच्छ होतो, त्यामुळे अंतर्गत भागांवर साबण किंवा वॉश वापरल्याने त्याचे नैसर्गिक पीएच संतुलन बिघडण्याची भीती असते. शिवाय जळजळ किंवा संसर्गाचा धोका यातून वाढतो.
मासिक पाळीच्या वेळी पॅड आणि टॅम्पन्स नियमितपणे बदलणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पॅड आणि टॅम्पन्स दर 4 ते 6 तासांनी बदलले पाहिजेत, प्रवाह कसाही असो हे करणे आवश्यक आहे. मासिक पाळीचे कप वापरणाऱ्यांसाठी, ते बहुतेकदा 12 तासांपर्यंत वापरले जाऊ शकतात, पण स्वच्छता राखण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी जास्त प्रवाह असलेल्या दिवसांमध्ये ते अधिक वेळा रिकामे करावे लागतं.
कापसापासून बनवलेले स्वच्छ, श्वास घेण्यायोग्य अंतर्वस्त्रे परिधान केल्याने ओलावा जमा होण्यापासून रोखण्यास मदत मिळते. ज्यामुळे अस्वस्थता किंवा संसर्ग होऊ शकतो. या काळात घट्ट किंवा सिंथेटिक कपडे टाळले पाहिजे.
मासिक पाळीच्या स्वच्छतेचा आणखी एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे नेहमी समोरून मागे पुसल्याने मूत्रमार्गात किंवा योनीमार्गात बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होतो.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
[ad_2]