छ.संभाजीनगर – प्रतिनिधी
डॉ.शेख साजीद मोहम्मद हे एक शांत संयमी व सुस्कृंत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात . त्यांचे वडील हे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय नौकरदार होते व त्यांना दोन भाऊ , बहीणी असा परिवार असलेल्या डॉ . साजीद यांचे शिक्षण हे औरंगाबाद शहरातच झाले आहे त्यांनतर त्यांनी फोस्टर कॉलेज औरंगाबाद येथून होमिओपॅथी साठीचे बिएचएमएस केले व पुढे त्यांनी सिम्बॉयसिस कॉलेज मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होमिओपॅथी तज्ञ म्हणून कामाला सुरूवात केली ..
कारकिर्दीच्या प्राथमिक टप्प्यानंतर त्यांनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुष इंटरनॅशनल या संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी कार्यरत असून होमिओपॅथीच्या प्रचार व प्रसारासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहेत आता त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत होमिओपॅथी असोशिएसनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गौरव सोनवणे यांनी होमिओपॅथिक तज्ञ डॉ शेख साजीद मोहम्मद यांची मराठवाडा अध्यक्षपदी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल आपण संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सर्वत्र पोहोचविण्यासाठी तसेच होमिओपॅथिक डॉक्टरांच्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी क्रियाशील राहून संस्थेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू असा विश्वास डॉ.शेख यांनी यावेळी व्यक्त केला आहे .
त्यांच्या या निवडीबद्दल (बीएए) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव सोनवणे , कोषाध्यक्ष डॉ. ओंकार पानसरे, उपाध्यक्ष डॉ. संतोषकुमार स्वामी, महिला प्रतिनिधी हो मोहद सानिद शेख डॉ. कोमल घुगे सदस्य डॉ. दिलीप साहु, डॉ. सिध्दार्थ शाहू, डॉ. योगेश यादव, डॉ. युवराज अहिरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत