वेलिंग्टन स्कूलमध्ये गुणवंत कौतुक सोहळा संपन्न……….

0

IMG-20250531-WA0007.jpg

नांदेड प्रतिनिधी :  

मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर व  सीबीएससी बोर्ड यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत  वेलिंग्टन स्कूल मधील विद्यार्थ्यांनी  100% निकालाची परंपरा कायम राखत. विद्यार्थ्यांनी याही वर्षी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा कायम राखला आहे.  या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शाळेतील नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास, सराव परीक्षा, प्रश्न निहाय सराव व विषय शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे सहज शक्य झाले अशी भावना व्यक्त केली.या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला. 

दहावी बोर्ड परीक्षेमध्ये  शाळेतून 

 1)कु.श्रुती श्रीराम जाधव 99.40% २)विद्या गोपाळ पाटील 92.40 ३)नीरज आठवले, ऋषिकेश गांजरे…90%… तर सीबीएसई मधून… साहिल मारुती दांडे …92.20.%  गुण  मिळवून प्रथम क्रमांक मिळवला…. इतर विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार निळकंठराव पावडे, मातोश्री सिंधुताई पावडे, संचालक प्रा. रवींद्र रेड्डी सर,अध्यक्ष विनोद पावडे , सचिव वर्षा विशाल पावडे, प्राचार्य चलपतिराव,   मुअ.सतीश सिरसाठ, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here