अनिल वीर सातारा : शैक्षणिक संस्थांसह शिक्षक, मागण्यांसंदर्भात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्यावतीने गांधी मैदान राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अशोक थोरात, सचिन नलावडे, शिक्षकेत्तर विद्यार्थी पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
शैक्षणिक क्षेत्रापुढील समस्या व प्रश्न शासन स्तरावरून त्वरित सोडविण्याचा निर्णय घेण्यात यावेत. या संदर्भातील नवा शासन निर्णय रद्द करून मागील २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत २८ मे २०२५ ला शिक्षण संचालकांनी काढलेले पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात याव्यात. शिक्षक भरतीबाबतचे पवित्र पोर्टल रद्द करावे, ते रद्द होईपर्यंत वर्षातून किमान दोनदा शिक्षक भरती करावी. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनयोजना लागू करावी. यासह विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.त्यामुळे जास्तीतजास्त शैक्षणिक संस्था, संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी भरत जगताप, नंदभाऊ जाधव, अनिरुद्ध गाढवे, चंद्रशेखर सावंत, सुरेश रोकडे, शिक्षण संस्था, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.