समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे !

0

सातारा : सामाजिक,धार्मिक आदी क्षेत्रात सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.आतापर्यंत सर्वच आपापल्या परीने कार्यरत आहेत.युवक मात्र कुठेच दिसत नाहीत.तेव्हा स्वतः व घर सांभाळून युवकांनी पुढे येऊन योगदान दिले पाहिजे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य आबासाहेब दणाने यांनी केले. येथील सम्यक जेष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे यांच्या भगिनी कालकथीत आशा पितांबर वाघमारे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात दणाने मार्गदर्शन करीत होते.

        थेरो दिंपकर यांच्या अधिपत्याखाली आबासाहेब दणाने यांनी संपूर्ण विधी पार पाडला.यावेळी धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलासराव कांबळे, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने,विवेक मस्के आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते हरिभाऊ जाधव,अशोक भोसले,मंगेश डावरे,सीताराम गायकवाड,अंकुश धाइंजे,माजी मुख्याध्यापक चंद्रकांत मस्के, मारुती भोसले,पी.टी. कांबळे, बळीराम जाधव, बाळासाहेब सावन्त, सुशांत येवले आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, बनसोडे परिवार, नातेवाईक उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here