सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नागठाणे येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

0

अनिल वीर सातारा : येथील यतिमखाना न दाऊळ उलूम  एज्युकेशन संस्था नागठाणे व सातारा ऊर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या मार्फत आयोजीत संस्थापक स्वर्गीय इब्राहिम मोहंमद सुतार इबुभाई विनामुल्य आरोग्य शिबीर वेळ संपन्न झाले.

 यामध्ये रोगनिदान, मोफत बीपी शुगर डोळे तपासणी व उपचार बाबत  तज्ञ डॉक्टरांनी मागदर्शन केले. कार्यकमाचे उद्‌घाटन चंद्रकांत जाधव आप्पा ( माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष) यांच्या हस्ते झाले.यावेळी शफिक भाई शेख ( जिल्हाध्यक्ष, सातारा अल्पसंख्याक  राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट) यांनी मार्गदर्शन केले. व्याक्ती व त्यांचे विविध रोग शारीरिक व्याधी व त्यावर उपचार या बद्दल मार्गदर्शन केले.अस्लम भाई सुतार यांनी शाळेबाबत माहिती दिली.डॉ. प्रमा गांधी (वैद्यकिय अधिकारी, पॉलिएटिव्ह केअर,सातारा) यांनी बीपी.शुगर, कॅन्सर  रोगा बद्दल व खाण्याच्या विविध सवयी जंकफूड बाबत विशेष माहिती दिली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा गांधी, डॉ. राहुल यादव,डॉ. मधुरा पाटील, डॉ. एस.के नायकवडी, डॉ. एन डी पिसे, शितल कारंडे, ऋषभ कुमार तसेच बोरगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर,डॉ.जीवन मोहिते,उपसरपंच अनिल साळुंखे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय साळुंखे यांची उपस्थिती होती.याकामी,संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सुतार,सचिव अस्लमभाई सुतार व सर्व पदाधिकारी शिक्षक व स्टाफ यांनी अथक असे परीश्रम घेतले. पठाण सर यांनी सूत्रसंचालन  केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here