साईबाबा संस्थानचा परवानगीसाठी न्यायालयात अर्ज शिर्डी : देशातील अनेक भाविकांची श्रद्धा असलेले शिर्डी येथील साई मंदिरात जाताना भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थानच्या समितीने याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना फुले उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबवून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
कोरोना काळात घातलेली बंदी आता साई संस्थान उठवणार आहे. कोरोना काळात साईबाबाना फुल, हार, प्रसाद वाहण्यास संस्थानने बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
कोरोना काळात घातलेली बंदी आता साई संस्थान उठवणार आहे. कोरोना काळात साईबाबाना फुल, हार, प्रसाद वाहण्यास संस्थानने बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.