फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजे गटाचे  निर्विवाद वर्चस्व      

0

फलटण प्रतिनिधी: श्रीकृष्ण सातव ,

                                  फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनलचे  14 उमेदवार विजयी झाले आहेत.  तर यापूर्वीच चार उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

नवनिर्वाचित सदस्य पुढील प्रमाणे आहेत.

बिनविरोध निवडून आलेले चार सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अक्षय गायकवाड, ग्रामपंचायत मतदार संघ, अनुसूचित जाती . निलेश कापसे, हमाल मापाडी मतदारसंघ. तुळशीदास शिंदे, सोसायटी इतर मागास मतदारसंघ,  संतोष जगताप . आर्थिक मागास मतदारसंघ 

                       सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,  चेतन सुभाष शिंदे, भगवान दादासो होळकर, शंभुराजे विनायकराव पाटील, शरद लक्ष्मण लोखंडे, ज्ञानदेव बाबासो गावडे, दीपक विठोबा गौड, भिमराव पोपटराव खताळ, सुनीता चंद्रकांत रणवरे महिला  सौ जयश्री गणपत सस्ते हे विजयी झालेले आहेत. तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून किरण सयाजी शिंदे चांगदेव कृष्णा खरात आणि व्यापारी मतदारसंघातून संजय हरिभाऊ कदम समोर दिलीप जाधव हे विजयी झालेले आहेत.

           सोमवार दि. १  मे रोजी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली . सुनील धायगुडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 92 टक्के मतदान झालेले आहे 2903 पैकी 2665 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही उमेदवारांची अनामत रक्कम  जप्त झालेली आहे. दरम्यान या निवडणुकीत सत्तारूढ पक्षाची किंमत करता येईल अशी चर्चा आधीपासूनच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here