आजार मुक्त होता
डाॅक्टरां देतो दुवा
खुश होवून बोलतो
कामालाआली दवा
कधी कधी म्हणतो
चांगली इथली हवा
छानआहे इस्पितळ
आराम पडे जीवा
कोरोनाच्या लढाईत
जाणीव झालीभावा
परिचारिका रूपात
देवदूत कळला नवा
वार्ड बाॅय कार्यरत
प्रत्येक कामात हवा
स्वच्छता कामगारां
कोण करतो वाहवा
अभिवादन या सर्वां
सलाम त्रिवार घ्यावा
माणूस आहो आपण
कृती उक्तीत दिसावा
सिस्टर वार्डबाॅय असे
खरोखर अमूल्य ठेवा
असल्या देवदुता प्रति
कृतज्ञताजाणीव ठेवा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
2)
सिस्टर ..
धन्यवाद डाॅक्टरां
होता आजार मुक्त
मुक्त स्तुती सुमने
करी आभार व्यक्त
फेडी नवस देवाचे
नमन करती भक्त
नातलग वाटे गोड
शुभेच्छा देतीआप्त
कौतुक इस्पितळांचे
साधने होती सशक्त
देणग्या देती कुणी
अपेक्षा पुरवी सुप्त
विसरून जाई मात्र
परिचारिकांना फक्त
पडद्याआड राहतात
नर्स वाॅर्ड बाॅय गुप्त
सेवा करती सिस्टर
भावना मात्र विरक्त
ते शिरीआशीर्वादाचे
किरीट अनभिषिक्त
नका देऊ बक्षीसही
दोन गोड शब्द व्यक्त
दिसू द्यावे कृतीतून
असे माणसाचे रक्त
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..