नर्स …/धन्यवाद ..

0

परिचारिकां  नेहमी

पडद्या  आड  राही

सेवात्यांची अमूल्य

कुणां कौतुक नाही 

वार्ड  बाॅय  कार्यरत

मदतीला  ठाई ठाई

धन्यवाद शब्द  एक

तोंडी कुणाच्या  येई

वर्षा  अभिनंदनाची 

नाव डाॅक्टरांचे होई

इस्पितळ छान होते 

अद्ययावत सर्वसोई

फेडती नवस  कुणी 

नाव भगवंताचे  घेई

धावला भक्तवत्सल

परमेश्वरा त्राही त्राही

धन्यताआप्त इष्टांची

सुश्रेय नातलगानांही

नर्स  वाॅर्ड बाॅय  गुप्त

बाजूला राही निर्मोही 

परिचारिका दिनीतरी 

जरा  अंतरंगात पाही

कृतज्ञता भारावलेली

देई  मानवतेची ग्वाही

 

धन्यवाद ..

आजार मुक्त  बनता

इस्पितळां  धन्यवाद 

सोई  सुविधा  उत्तम 

कौतुकही मन मुराद 

जेवण  दवाखान्याचे

घेतला बरा आस्वाद 

आभार मानी  खरेचं

डाॅक्टराचे  निर्विवाद 

नवस  फेडतो देवांचे

घाली  त्या आर्तसाद

गरीबांना अन्नदानही

दावितो  छान  नैवेद्य 

वाॅर्डबाॅयपरिचारिका 

कुणास ना येती याद

स्वच्छताकर्मचारी ते

कर्मयोगास नसे दाद

माणूस आहोआपण

मग काअसा उन्माद 

बक्षीसी भले नको रे

द्यावे निदानधन्यवाद 

विसरतो का उपकार

मी सुसंस्कृत उस्ताद

डोकवा अंतकरणात

विकृती करी उच्छाद

 – हेमंत मुसरीफ पुणे. 

   9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here