रोजची तीचंआरती
तेचं तसेचं पारायण
ऐकुनि किटले कान
कंटाळला नारायण !
आरोपांच्या चिखला
गढूळले राजकारण
दिसता नवीन कपडे
राळ उडे निषकारण !
तेच ते बेचव पदार्थ
म्हणता मीचं सुगरण
अळणी झाले मीठही
ते नको वाटते जेवण…
बड बड गीते गातात
सरले नाही बालपण
बुध्यांक आहे तितका
मिळावे वाटे मोठेपण…
बदलतात सारे चॅनेल
नको आता घण घण
काही जणांना पाहता
डोस्के करते भणभण…
ओपिनियन पाॅल घ्या
कसे वागतोयं आपण
प्रत्यक्ष दिसेनाकाकण
पहायचा निदान दर्पण ….
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
सर्वेक्षण ..
काय बोलला काल
आज होई विस्मरण
किती वेळा ऐकवालं
तेचं तसलेचं भाषण…
ढिसाळकसाळ सभा
राहिले कुठे आकर्षण
फक्तदेता शिव्याशाप
जोरात चालले घर्षण…..
काढा फक्त आईबाप
विसरे संस्कृती दर्शन
आरोपांच्या त्या फैरी
कुवतीचे करे प्रदर्शन….
कितीही करा चांगले
केवळ द्यायचे दूषण
अर्वाच्च वाचाळवीरां
असभ्यतेचे विभूषण….
शब्दकोष देऊ तुम्हां
वापरा नवी विशेषण
विचारी दरवाजे बंद
बुध्दीत असे अवर्षण…..
डोकवा जरा अंतरंगा
करावे नीट निरीक्षण
कुठेचुकते का आपले
करा निक्षून सर्वेक्षण….
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.