बाळ बाप ..
रे मुलाने व्हावे बाप
वडील लहानगे बाळ
म्हातारपणी बापाला
फुलासमान सांभाळ…
किती सोसले बापाने
मुलाची नसे आबाळ
लक्ष सगळे रोपाकडे
झुके खाली आभाळ….
तुम्हां देताना उजेड
सोसला त्याने जाळ
रोप उबवण्या साठी
घुसला ऊरात फाळ…
तुला नसे काही कमी
सुखानंदाचा सुकाळ
आपण सोसतो झळा
एकले पेलले दुष्काळ…
आताआली तुझी वेळ
श्रावणबाळ धर्म पाळ
सूर्य चालला अस्ताला
होई त्याची सायंकाळ….
2)
पिता …
पित्याच्या जा जवळ
वाटते जेव्हा अस्वस्थ
डोक्यावर नीत त्याचा
हात अदृश्य आश्वस्थ…
वटवृक्षा सारखाचं तो
व्हा खुशाल अधिनस्थ
पहुंडा होऊन पांथस्थ
नजर घाली ती गस्त…
करत असतो तो सारे
तरीही दिसतो त्रयस्थ
डोळा कडा नीट पहा
समुद लपला प्रशस्त…
नामानिरळा राही तोचं
मुले होती जशी स्वस्थ
जीव घोटाळे घरातचं
आगळा वेगळा गृहस्थ …
मुले हीच संपत्ती खरी
होतो निरामय विश्वस्थ
पिता व्हालं तेव्हा कळे
हेतू आतला अंत्यस्थ…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..