पितासागर …
कोण म्हणे पित्याच्या
डोळा नसतो सागर
दूर राहे जहाज उभे
घुसतो खोलात लंगर
कडक असतो खडक
घालतो भावना आवर
लाटा जरी उंच उसळे
फुटे अंती किनाऱ्यावर
खारट पणा जाणवतो
पाणी तोंडी गेल्यावर
बाष्प होऊनि बरसतो
पाऊस तोचं धरतीवर
समुद्राचा थांग न लागे
नजर लांबली दूरवर
जाणून घे खोली किती
कधी तरी जा खोलवर
काय काय मिळे विश्वा
समुद्र मंथन केल्यावर
विष पिणारा पिताश्री
एकचं तो शिव शंकर
-हेमंत मुसरीफ पुणे
97303069996.