गणेश कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे-थोरातांची महसूलमंत्री विखे पाटलांना मात !

0

शिर्डी : नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय रंजक व राजकीय घडामोडी घडत पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी विखे गटाला थोरात युतीने अस्मान दाखवत १९ पैकी तब्बल १८ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. राज्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर आपले राजकीय वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विखे पाटलांना आपल्या होम ग्राऊंडवरील सहकारी संस्थेतच पराभव पत्करावा लागल्याने याची अधिक राजकीय चर्चा झडत आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचेच असलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मध्ये होत असल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती . यात विशेष म्हणजे कोपरगाव तालुक्यातील दुसरी महाशक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपली राजकीय कसब गणेश सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वांसमोर दाखवली. अनेक स्तरांमधून त्यांच्यावर होणाऱ्या टीका टिप्पणी आणि होणाऱ्या दमबाजीला जास्त महत्व न देता आपल्या कर्तृत्वातून त्यांनी विखे पाटलांसारख्या दिग्गजांच्या हातातून सत्ता खेचून आणली . गेल्या आठ वर्षांपासून विखेंच्या कारभाराला कंटाळलेल्या सभासदांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कोल्हे- थोरात जागृती पॅनलला पसंती देत कारखान्याची सत्ता निर्विवादपणे विवेक कोल्हे यांच्या ताब्यात दिली आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र या लढाईत अपयश मिळाले आहे. परिसरामध्ये त्यांच्याविषयी असलेला असंतोष या निवडणुकीच्या माध्यमातून बघावयास मिळाला तसेच या निकालामुळे भविष्यातील राजकीय परिस्थिती काय असेल याची देखील भविष्य यातून सिद्ध होत आहे विखे पाटील यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. स्वतःच्या मतदारसंघातील कारखान्याची निवडणूक बिनविरोध करता आलीच नाही परंतु कारखान्याच्या सत्तेला देखील आता मुकावे लागले आहे. यात खरं विवेक कोल्हे यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुणूकच यामध्ये दाखवली आहे. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखाना व शेतकरी यांचे हित नेहमी जोपासले आहे . जिल्ह्याच्या राजकारणामध्ये थोरात आणि विखे या दोन घराण्यापासून जिल्ह्याचे राजकारण फिरत असते. यावेळी मात्र विखे पाटलांना जिल्ह्याच्या राजकारणात अडवण्यात थोरात पूर्णपणे यशस्वी ठरले आहे. याची पहिली चुणूक म्हणजे अगस्ती कारखान्याचे निवडणुकीतही विखे आणि विचारांच्या पॅनलला पूर्णपणे धूळ चालण्यात थोरात यशस्वी ठरले होते. त्याच पद्धतीने त्याचीच पुनरावृत्ती गणेश गणेश कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी आखलेली व्यूहनीती आणि त्याच सोबत विखेंचे पारंपारिक विरोधक कोल्हेना हाताशी धरून विखेंना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे जिल्ह्याच्या सहकारांमध्ये असलेले विखेंची मांड आता ढिली होतानी दिसत आहे. प्रत्येक मतदारसंघात विखेंचा असलेला गट लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोधाला सामोरे जाण्याची दाट शक्यता या निकालामुळे झाली आहे. या सत्तांतरामुळे गणेश कारखाना व परिसराला उर्जितावस्था मिळून परिसराचे नंदनवन व्हावे व पुन्हा चांगले दिवस यावे हीच अपेक्षा शेतकरी आणि सभासदांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here