४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
————-
पैठण,दिं.९.(प्रतिनिधी) : पालकमंत्री संदिपान भुमरे व चेअरमन विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न. ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
पैठण शहरातील नवीन कावसान भागात रोहयो तथा पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे व रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते झाले.
या या शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ७३१ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली अशी माहिती आयोजक नगरसेवक कृष्णा मापारी यांनी दिली. सदर शिबिरात कॅल्शियम तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्र तपासणी, एसजीओटी- एसजीपीटी तपासणी, क्रेटीनाइन तपासणी, कॅन्सरमार्कर तपासणी, सीबीसी तपासणी, थायराईड तपासणी सह स्त्रियांच्या विविध आजारावर तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी नाथ संस्थांनचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, महानंदचे राज्य संचालक नंदलाल अण्णा काळे, एकनाथ नरवडे महाराज, सोमनाथ परदेशी, शेखर शिंदे, नगरसेवक बाळू माने, संतोष सव्वाशे, जालिंदर अडसूळ, पुष्पाताई गव्हाणे, ज्योती काकडे सुनीता गलधर, शांताबाई सानप यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन दराडे यांनी केले तर आभार कल्याण धायकर यांनी मांनले तर आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी हर्षद पठाडे,ओमकार जमधडे,शिवम पवार,राहुल मापारी, संकेत शिरसाठ, अदील शेख, दत्ता सव्वाशे, सोमनाथ अकोलकर, अविनाश शिरवत, राजेंद्र मापारी, शिवमल्हार पिंपळे,अशोक दसपुते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.