जत दि. 11 (प्रतिनिधी) आपण सर्वांनी विद्यार्थी केंद्रीभूत मानून काम करायचे आहे. झपाट्याने बदलत्या परिस्थितीत सुध्दा शैक्षणिक संस्थानी काळानुसार अपडेट्स राहावे यासाठी नॅक मूल्यांकन संकल्पना अस्तित्वात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने “नॅकची नविन कार्यपध्दती आणि अभ्यासक्रम व पोग्राम आऊटकमस् ” या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणून बळवंत महाविद्यालय, विटा येथील प्राणीशास्त्राचे प्रा. राहूल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाल यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित आणि एका विशिष्ट सिस्टीमने चालावे यासाठीच नॅकची संकल्पना अस्तित्वात आली आहे. असे सांगून प्राचार्य डॉ. सुरश पाटील यांनी आपणास नॅकसाठी नाही तर संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी व विद्यार्थ्यांसाठी काम करायचे असून नॅकचे काम गांभीर्याने न करता आनंदाने केल्यास नॅकचे काम उत्तमरित्या पूर्ण होईल, असेही प्राचार्य शेवटी म्हणाले.
यावेळी विषय तज्ञ म्हणून उपस्थित असणारे प्रा.राहूल पाटील यांनी नॅकची संपूर्ण सिस्टीम समजावून सांगून नॅकला सामोरा जाताना अभ्यासक्रम व पोग्राम आऊटकमस् किती महत्वाचे आहेत हे स्पष्ट करुन सांगितले. तसेच गुण वाढीसाठी नेमके पणाने काम कसे केले पाहिजे हे या एक दिवसीय कार्यशाळेत सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाल यांनी प्रास्ताविक करुन सर्वाचे स्वागत केले. यावेळी नॅकचे सहसमन्वयक प्रा.रामदास बनसोडे, उपप्राचार्य प्रा. महादेव करेनव्वर, सर्व विभागाचे विभाग प्रमुखांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. शेवटी क्रायटेरिया नंबर दोन चे प्रमुख डॉ. राजेंद्र लवटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.