एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘जागतिक ओझोन दिन’ संपन्न

0

हडपसर: 17 सप्टेंबर 2023.
प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भूगोल विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग, आणि आय.क्यू.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करण्यात आला.
जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून या वर्षाची ओझोन दिवसाची थीम ‘Montreal Prtocal :Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change’ या विषयावर आधारित पोस्टर प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये एस. वाय.बी.सी.एस., बी.सी.ए., बी.बी.ए.सी.ए. या वर्गातील एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड म्हणाले की, मानवनिर्मित कृतीमुळे ओझोनचा थर क्षय होत चालला आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे पोस्टर प्रदर्शन होणे गरजेचे आहे.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभागप्रमुख डॉ.संजय जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा.माधुरी एकशिंगे भूगोल विभागाचे डॉ.बाळासाहेब माळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. संगिता यादव, डॉ.एकनाथ मुंढे, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ.सरोज पांढरबळे, प्रा.ऋषिकेश खोडदे, प्रा.महेश देवकर, प्रा.अविनाश जाधव, डॉ.संदीप वाकडे, प्रा. गजानन घोडके, डॉ.ज्योती किरवे इतर प्राध्यापक उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here