सातारा/अनिल वीर : शेणोली, ता.कराड येथील स्नेहलता निखिल गायकवाड यांचे अल्पशा आजाराने ४६ व्या वर्षी निधन झाल्याने आदरांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा भारतीय बौध्द महासभेचे कराड तासगांव रोडवर होत असलेल्या महाविहाराचे माजी धम्मसेवक, निष्टावंत, श्रध्दाशिल व बौद्धाचार्य निखील गायकवाड यांच्या त्या सहचारीणी सुविद्य पत्नी होत्या.स्नेहलता यांनी मोलमजुरी व काबाडकष्ट करून मुलांच्यासाठी उच्च शिक्षणासाठी अथक असे परिश्रम घेतले.त्यांना आदरांजली सम्राट बुद्ध विहारात अर्पण करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे, सरचिटणीस तानाजी बनसोडे आदी आजी-माजी जिल्हा व तालुका पदाधिकारी,कार्यकरिणी व सदस्य तसेच धम्मबांधव ग्रूपतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.