एस.एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन”

0

” :

पुणे /हडपसर प्रतिनिधी

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील Victory 136 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वाणिज्य प्रदर्शन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आह़े. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धा पार पडणार असून या सर्व स्पर्धांचे प्रमुख म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे या काम पाहणार आहेत.
तसेच एस. एम. जोशी कॉलेज व संपूर्ण साधना शैक्षणिक संकुल यांच्या वतीने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन परिचयावर आधारीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आह़े. व्याख्यान देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस हे शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता महाविद्यालयात उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरविंद रामभाऊ तुपे, महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे हे उपस्थिती राहणार आहेत. तसेच एस. एम. जोशी कॉलेजमधील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक साधना शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच हडपसर परिसरातील नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here