निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस ;प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

            अहमदनगर जिल्ह्यातील Nilwande Dam निळवंडे धरणाच्या निर्मितीला 53 वर्ष झाली. याधरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याची कामे राज्यकर्त्यांच्या उदानसीतामुळे पूर्ण होत नाही.उजव्या व डाव्या कालव्यांची कामे जलद गतीने पुर्ण करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गांधी जयंतीच्या दिवशी तांभेरे गावातील राम मंदिरात निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष Dadasaheb Pawar दादासाहेब पवार यांनी उपोषण सुरू करुन तिसरा दिवस उलटला असून संबधित सक्षम आधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे.पवार यांची प्रकृती खालवली आहे.

               निळवंडे धरणावरील लाभ श्रेञातील  182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे. प्रस्तावित कालव्यांमध्ये वन विभागाच्या येणाऱ्या अडचणी दुर कराव्यात, डाव्या आणि उजव्या कालवे हे बंदिस्त ऐवजी उघड्या पद्धतीने कराव्यात अशा अनेक मागण्या  उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

या उपोषणाचा तिसरा दिवस उजला आहे.उपोषणकर्त्यांची तहसिलदार चंद्रजित रजपूत, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पाटबंधारे विभागाचे अभियंता कृष्णा बढे,अविनाश सानप आदींनी भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.पाटबंधारे विभागाचे सक्षम अधिकारी मागण्या बाबत लेखी हमी देतील त्याचवेळी उपोषण मागे घेतले जाईल असे पवार यांनी सांगितले.

            तांभेरे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी विद्या चोळके यांनी उपोषणकर्त्या दादासाहेब पवार यांची वैद्यकिय तपासणी केली असता वजन घटल्याचे त्यांनी सांगितले.

          निळवंडेच्या आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटने पाठोपाठ विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देवून दोन दिवसात निर्णय घेतला नाही.तर रस्त्यावर उतरावे लागेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे,धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे,प्रहार संघटनेचे राहता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके,अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष सुनील निमसे,अशोक खंडागळे, प्रकाश वाघे,नितीन  गमे महादू कांदळकर, भाऊ गमे आदी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.राहता तालुक्यातील केलवड व आडगाव येथिल लाभधारक शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देवून शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास राहता तालुक्यातील गावे बंद ठेवून शासनाचा निषेध केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here