कोपरगाव : सोमैया विद्याविहार संचलित, श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव येथे शाळेच्या ४९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जर्मनीतील नामांकित कंपनीचे संचालक भास्कर शेट्टी तसेच कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी वैभव आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी जितेंद्र गंगवाल, संदीप डागा, राजेंद्र पांढरे, दिगंबर गाडे, तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनीही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवूनविद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची उल्लेखनीय बाब की उपस्थित सर्व मान्यवर हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैभव आढाव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगत असताना खेळामुळेच निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त व सहकार्याची भावना वाढीस लागून उत्तम नागरिक कसा घडतो याबद्दल मार्गदर्शन केले. व भास्कर शेट्टी यांनी विद्यार्थ्याना देशविदेशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उपलब्ध शैक्षणिक संधीबाबत मार्गदर्शन केले. तसेच शारीरिक तंदुरिस्थिसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने व्यायाम करणे व विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी लंगडी, धावणे, तीन पायांची शर्यत, संगीत खुर्ची,चमचा-लिंबू शर्यत, फुगा फुटणे, बेडूक उडी, ससा उडी यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांसाठी अंतिम फेरी घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके व प्रशस्ती प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला पालकांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये महिला पालक वर्गाने उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माननीय प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे सरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सहभाग नोंदवला. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले.