देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा ते टाकळीमियाँ या रस्त्याचे केंद्राच्या निधीतून काम सुरु असताना रात्रीच्या दरम्यान रस्त्यावरील कचखडी चोरून नेत असताना विरोध केला म्हणून शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण करत गावठी कट्टा डोक्याला लाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा ते टाकळीमियाँ रस्त्यावरील देशमुख वस्ती जवळ येथे दि. ९ मे रोजी मध्यराञी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,राहुरी तालूक्यातील टाकळीमियाॅ येथिल ठेकेदार महेश चंद्रकांत गायकवाड, वय ३२ वर्षे, हे महेश इंन्फ्रा कॉन्ट्रॅक्टरच नावाने रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचा ठेका घेतात.दि. ९ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वा. देवळाली प्रवरा ते टाकळीमियाँ शासकीय रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी देशमुख वस्ती, टाकळीमियाँ येथे रस्त्याच्या कडेला टाकलेली कच खडी काही लोक टेम्पो मध्ये भरत असल्याची माहिती मिळाली तेव्हा घटनेच्या प्रत्यक्ष जावून पाहिले असता चार ते पाच जण एका टेंपोत कचखडी भरीत असल्याचे दिसले.महेश गायकवाड यांनी कचखडी भरण्यास विरोध केला. यावेळी चार ते पाच जणांनी महेश गायकवाड यांना शिवीगाळ करुन दमदाटी करत लाथा बूक्क्यांनी व हातातील खोऱ्याने मारहाण केली. तसेच गावठी कट्टा डोक्याला लाऊन जिवे मारण्याची धमकी दिली.गायकवाड यांच्या चारचाकी गाडीचे नुकसान केले. तसेच गाडीमधील २० हजार रुपये रोख रक्कम आरोपी जबरदस्तीने घेऊन गेले. महेश चंद्रकांत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी माऊली भागवत, सोमा भागवत (रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी) व इतर पाच अनोळखी इसम या लोकांवर विरोधात गुन्हा रजि. नं. ५६८/२०२४ भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३२७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१), १३५, ३७(३) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहेत