रावणगाव प्रा. आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याचा हजारो रुपयांचा घोटाळा?

0

रावणगाव, दौंड , परशुराम निखळे : 

शनिवार दिनांक 3/5/24रोजी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रावणगाव चे डॉ.मोहण पांढरे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर प्रा आ केंद्र कुरकुंभ या ठिकाणी घेतला, यात कुरकुंभ  रावणगाव चे पेशंट वर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शासकीय  शिबिरात कोणतीही फी आकारली जात नाही. प्रा आ  केंद्रात असे सीझरियन शस्त्रक्रिया साठी  परवानगी नसताना  नियम डावलून, सीझरियन शस्त्रक्रिया घेण्यात आली व प्रत्येक पेशंट कडून दोन हजार फी घेण्यात आली.

हे बाहेरचे  खाजगी डॉ. आहेत त्यांची फी  द्यायची आहे असे पेशंट ला सांगण्यात आले.

याची शहानिशा  करण्यात आली असता हे डॉ. खाजगी नसून ते शासकीय आहेत तसेच फलटण तालुक्यात प्रा. आ. केंद्रात गिरवी येथे कार्यरत आहेत.

रावणगाव चा  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब पेशंट कडून पैसे घेऊन स्वतःचा खिशात घातले आहेत.एका पेशंटला दोन हजार रुपये घेतले गेले

पेशंट ला सेवा पुरवणे ऐवजी सीझरीयन शस्त्रक्रिया ला परवानगी  नसताना  शिबीर आयोजित करून पैसे  उकळण्याचा व स्वतःचे खिसे भरण्याचा  गैरकारभार केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण तीस तेबत्तीस हजार लोकसंख्या या रावणगाव चा  डॉ अधिकारीवर अवलंबून आहे परंतु  यांच्या कडून कामात हलगर्जीपणा दिसून येत आहे रुग्णांना ताटकळत बसावे लागते तसेच कर्मचारी व अधिकारी यांचे  वादविवाद चे प्रकार ही समोर आले आहेत.

दिवसरात्र दोनच आरोग्यसेविका सेवा बजावत आहेत त्यामुळे कामाचा  अतिरिक्त ताण येऊन दमछाक होत आहे.

केस पेपर काढणेस कोणी नाही तर डाटा ऑपरेटर किंवा कोणी ही पेपर काढतंय,काही वेळातर अधिकारी ला पेपर ची देवाण घेवाण करावी लागतीय. फार्मासिस्ट जागेवर नसता  तर शिपाई च  औषधी  देण्याचं काम करताना निदर्शनास आले आहे.

कोणी कुणाची कामे करतंय.

आरोग्य केंद्राचा भोवती  कचऱ्याचा ढीग साठत आहे एकीकडे आणि दुसरीकडे कर्मचारीवर अतिरिक्त अनेक कामे यामुळे सामान्य रुग्ण व नातेवाईकांचा रोषाला सामोरे जावे लागत आहे, याचा मानसिक त्रास सहन करावा  लागत असल्याची खंत अधिकारी , कर्मचारी करत आहेत.

सदर कुरकुंभ शिबीर बाबत चौकशी साठी  तालुका अधिकारी यांना संपर्क  केला असता त्यांच्याकडून कसलाही  प्रतिसाद नाही.तालुका अधिकारी यांची या शिबिरास परवानगी  होती किंवा नव्हती, आणि ती का व कशी  तसेच नियमबाह्य हे शिबीर  आयोजित कसे झाले, आपण  या कॅम्प ला सहभागी होतात  का या सर्वं बाबींचा  एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी खुलासा करणे अपेक्षित आहे परंतु त्या स्वता कॅमपला हथेली लावुन गेले आहेत फोन हि उचलत नाहीत त्या कोणत्या हि कामाची दखल  घेत नसल्याचे दिसून येते.

मला कुठलीही कल्पना न देता डॉ कदम कुरकुंभ येथे  शस्त्रक्रिया शिबीर  ला गेलें नॉर्मल सह सीझरीयन ही झाले, याबाबत आमच्याकडे माहिती नाही तरी याची चौकशी करून डॉ कदम प्रा आ केंद्र गिरवी, फलटण यांचेवर कारवाई केली जाईन.

निखिल दिघे, तालुका आरोग्य अधिकारी, फलटण.

शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया साठी  कोणतीही फी घेतली जात नाही. नियमबाह्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर  कुरकुंभ व येथे झालेले नॉर्मल सीझरीयन चौकशी करून  संबंधित तालुका अधिकारी, प्रा आ केंद्र   रावणगाव चे  अधिकारी यांची शिबिरात घेण्यात आलेल्या फी  विषयी  चौकशी करून  योग्य ती कारवाई करण्यात येईन.

सचिन देसाई, ज़िल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.

प्रा. आ. केंद्र रावणगाव येथे दोन महिला डॉ होऊन गेलें. त्या काळात 2022-2023 पर्यंत 100-150चा आसपास ओपीडी होती आणि आज पाहिले तर ती फक्त 30 वर आली आहे  तर व्हिजिट, फिरती चा  नावाखाली  हे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी पार्टी करत फिरत आहेत. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपेरेशन आणि प्रसूतीचे  प्रमाण, ओपीडी चे प्रमाण अत्यल्प झाले आहे.

आरोग्य केंद्रात कुठे स्वच्छता नाही. अधिकारी म्हणून यांचं नियंत्रण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here