उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर,प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून उरण तालुक्यातील गोवठणे गावचे सुपुत्र समाधान गुरुनाथ म्हात्रे यांची ओळख आहे. गोवठने ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस स्वर्गीय प्रशांतभाऊ पाटील तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान म्हात्रे यांनी समाजात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले, पक्षाचा तळागाळात प्रचार प्रसार केला. त्यांचे हे योगदान लक्षात घेता पक्ष संघटना तळागाळात वाढविण्याच्या दृष्टीने समाधान गुरुनाथ म्हात्रे (गोवठणे)यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महेबुब शेख – प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी मुंबई मधील पक्षाच्या कार्यालयात समाधान म्हात्रे यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर,युवक कोकण अध्यक्ष प्रमोद बागल, पनवेल युवक अध्यक्ष शहाबाज पटेल,उरण विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाधान म्हात्रे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन यांच्या वर्षाव होत आहे.सदर प्रसंगी कै. प्रशांत भाऊ पाटील यांची आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नेहमी आठवण येत आहे. ते आज असते तर अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असती. ते आज आपल्यात नाहीत याची मला खंत वाटते. मात्र प्रशांत भाऊ यांचे स्वप्न आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पूर्ण करणार असे भावनिक मत या प्रसंगी नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी व्यक्त केले.