५० वर्षीय ह्दयरुग्णावर यशस्वीरीत्या अत्याधुनिक मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी..!

0

यशोदा हॉस्पिटल सिंकदबाद टिमचे सुयश..!!

नांदेड – प्रतिनिधी

सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या ह्दयरोग तज्ञ तथा सर्जन डॉ. विशाल खणते व संपूर्ण टिमने मूळचे धाराशिव जिल्हयातील कळंब तालुक्यातील रहीवाशी असलेल्या ५० वर्षीय ह्दयरोगाने ग्रस्त रुग्ण भुजंग बिडवे यांच्यावर सिंकदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या अत्याधुनिक मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी म्हणजेच बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

या अत्याधुनिक व कमी जोखमीच्या ह्दय शस्त्रक्रियेबद्दल सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने यशोदा हॉस्पिटलच्या वतीने येथील हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सविस्तर माहीती देतांना सिव्हीटीएस सर्जन तथ ह्दयरोग तज्ञ डॉ. विशाल खणते यांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी भुजंग बिडवे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या नंतर संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये अंजॉग्रफी तपासणी करण्यात आली.

त्यावेळी तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज दिसून आले त्यानुसार त्यांनी सदर रुग्णास बायपास शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले. सदर रुग्णाच्या नातेवाईकाने गंगाखेड येथील प्रसिद्ध डॉ. संजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता डॉ.संजय मुंडे यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सिव्हीटीएस सर्जन डॉक्टर विशाल खणते यांच्याकडे संदर्भित केले,

त्यानंतर सदरील रुग्णास मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी या अत्याधुनिक ह्दयरोग शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णांनी आठ दिवसानंतर येऊन अतिशय कमी त्रासामध्ये आणि दोन ते तीन टाक्यांमध्ये केली जाणारी ह्दयरोग बायपास शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉ. विशाल खणते यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. 

मिनिमली इनवेसिव्ह हृदय शस्त्रक्रिया म्हणजे काय ?

या शस्त्रक्रियेमध्ये हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी ही अतिशय कमी वेदनेमध्ये ओपन हॉट सर्जरी न करता दोन ते तीन टाक्यांमध्ये सर्जरी करण्यात येते. यामुळे सदर रुग्णास चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून डिस्चार्ज करण्यात येतो.या शस्त्रक्रियेमुळे होणारे फायदे असे आहेत की यात पूर्ण ओपन हर्ट सर्जरी न करता फक्त दोन ते तीन टाक्यांमध्ये ही शस्त्रक्रिया होते त्यामुळे कमी वेदना इन्फेक्शनचा चान्स कमी घाव लवकर भरून येतो आणि रिकवरी ही फास्ट होते. 

कमीतकमी त्रासाची हृदय शस्त्रक्रिया…

मिनिमली इनवेसिव्ह हार्ट सर्जरी ही एक किंवा अधिक लहान छातीच्या चीरांद्वारे केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी एक संज्ञा आहे. याउलट, ओपन-हार्ट सर्जरी तुमच्या छातीच्या मध्यभागी एक लांब चीरा वापरतात. कमीतकमी जागेत चिरफाड केल्याने या कमी जखम आणि कमी वेदना आणि जलद पुनर्प्राप्ती देऊ शकतो.

यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सेवांबाबत अधिक माहिती हवी असल्यास  किरण बंडे – 9154167997 किंवा अनिल जोंधळे 9154995463 आदी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यशोदा हॉस्पिटल सिंकदराबादच्या वतीने करण्यात आले आहे  .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here