द्राक्ष हंगाम संकटात! यंदा उत्पादनात ४०% घट

0

नाशिक प्रतिनिधी : राज्यातील द्राक्ष हंगाम यंदा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. अतिवृष्टी व मॉन्सूनोत्तर पावसामुळे नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील मुख्य द्राक्ष उत्पादक पट्ट्यात छाटणीपासूनच बागा अडचणीत सापडल्या.
परिणामी, आता काढणीला वेग आला असताना मालाची उपलब्धता कमी असल्याने राज्यात द्राक्ष उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा स्थानिक व निर्यातक्षम मालाला उठाव असल्याने दर टिकून असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, दरातील अस्थिरता, बाजारपेठेत येणारे अडथळे अशा एक ना अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडल्याने क्षेत्र कमी झाले आहे. मात्र ज्या बागा शिल्लक आहे. त्यांच्यामध्ये उत्पादनाच्या अनुषंगाने आव्हाने कायम दिसून आली. प्रामुख्याने द्राक्ष नाशिक विभाग आघाडीवर असतो. येथे सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे आगाप छाटणी झालेल्या बागांमध्ये मोठे नुकसान होते. यंदा मालाची उपलब्धता कमी असल्याने मागणीच्या तुलनेत दर टिकून असल्याचे चित्र आहे.
            अतिवृष्टीच्या तडाख्यात बागा सापडल्या. खरड छाटणीपश्‍चात पाऊस व कमी सूर्यप्रकाश असल्याने घडनिर्मिती धारणेवर परिणाम दिसून आला. तर ऑक्टोबर गोडी बहार छाटणीनंतर द्राक्ष बागांमध्ये घड कमी निघाल्याने परिणाम उत्पादनावर आहे. सांगली, सोलापूरसह, नाशिक भागांत पारंपरिक वाण व लांबट वाणांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे. नाशिक विभागात ४० टक्के, तर सांगली व सोलापूरच्या बहुतांश भागात ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी आहे.

सांगली, सोलापूरसह उत्तर कर्नाटकात फटका

सांगली भागात ५० टक्क्यांवर हंगाम आटोपला आहे. थेट विक्री व बेदाणानिर्मितीसाठी हमाल प्रामुख्याने जात आहे. दर वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी असून सफेद वाणामध्ये ६ ते ७ तर काळ्या वाणात ३ ते ४ टन माल निघत आहे. सांगलीसह सोलापूर व उत्तर कर्नाटक भागातील द्राक्ष पट्ट्यात ही स्थिती आहे, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघाचे उपाध्यक्ष मारोतराव चव्हाण यांनी सांगितले.


…ही आहेत कारणे

– पहिल्या टप्प्यात ५ ते २५ सप्टेंबर दरम्यान आगाप बहर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांमध्ये गळकुज

– ऑक्टोबर महिन्यात छाटणीनंतर झालेल्या पावसाचा फटका; डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने घड कमी व कमकुवत

– अनेक ठिकाणी गोळी घड, कोवळ्या फुटींचे नुकसान

– सततच्या पावसामुळे वेलींच्या मुळ्यांची कार्यक्षमता मंदावली तसेच वेलीमध्ये अन्न साठवणूक पुरेशी झालेले नाही.

– घड कमकुवत निघण्यासह घडांची कमी संख्या व आता काढणीदरम्यान कमी वजन

कैलास भोसले, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघप्रतिकूल परिस्थितीत यंदा द्राक्ष उत्पादन घेतले. नाशिक भागातही ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी आहे. उत्पादनाचे गणित व्यस्त, तर दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा टेकू मिळाला आहे.शिवाजीराव पवार,खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघकाडी सशक्त झाली नाही, घड निर्मितीवर परिणाम दिसून आला. ठरावीक ठिकाणी काही शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले असले तरी बहुतांश ठिकाणी उत्पादन घटलेले दिसते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here