सुनिता निरोप देता
गहिवरले अंतराळ
क्षमा मागे कैकवेळ
झालीतुझी आबाळ…
चारदिसांची पाहुणी
केला सुखे सांभाळ
कर्तृत्व उंची पाहता
पायालोळे आभाळ
कैकशोधांचीजननी
गळ्यां विजयीमाळ
कौतुककरेआसमंत
अदृश्य सजे प्रभाळ
तारांगणपण दिपले
आला दिप्तीउमाळ
नव ग्रह सोबत राही
भाग्यवान रे कपाळ
मृत्यू सतावे सारखा
निर्धारकरे प्रतिपाळ
अवनी स्वागत करी
मनोमनी मृदुंग टाळ
नमनअथक प्रयासा
नोंदला सुवर्ण काळ
औत्सुक्यअनुभवाचे
कहाणी कडू मधाळ
–हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..