राजन लाखे, लक्ष्मीकांत खाबिया, कल्याणजी गायकवाड, संतोष लोंढे यांच्या हस्ते प्रकाशन
स्नेहा मडावी, पुणे प्रतिनिधी :
भोसरी पुणे येथील लेखक संदीप राक्षे यांनी लिहीलेले लेण्यांचा महाराष्ट्र या पुस्तकाचे प्रकाशन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया व महाराष्ट्र शासन कंठ संगीत पुरस्कार प्राप्त असलेले पं कल्याणजी गायकवाड यांच्या शुभहस्ते शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मसापचे अध्यक्ष राजन लाखे सर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कामगार नेते सचिनभैय्या लांडगे, महागायक कौस्तुभ गायकवाड, पवना बँकेचे संचालक दादू डोळस, राजगुरुनगर सह बँकेच्या संचालक अश्विनी पाचारणे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शरद खोपडे, पूजा गौरव राक्षे, मारूती तायनाथ, सचिन खलाटे, संतोष साळुंके, सचिन गोडांबे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारूती कदम यांनी केले होते. कार्यक्रमाचे आयोजन राजेश राक्षे, गौरव राक्षे, संकेत राक्षे, रितेश राक्षे यांनी केले होते. हा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा गुळवे वस्ती भोसरी येथे संपन्न झाला..