[ad_1]
शिवभक्त डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या स्मरणार्थ परळी येथील आयडीबीआय बँकेच्या समोर वाटसरूंची तहान भागवण्यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोज संकाये यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
.
कडक उन्हाळ्यामध्ये परळीत येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या थंडगार पाण्याची सोय व्हावी, म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सध्या सुरू आहे. परंतु, शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील तसेच शहरातील नागरिकांची तहान भागावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाणपोईची संकल्पना ॲड. मनोज संकाये मित्र मंडळ राबवत आहे.
यावेळी मंगलवार मल्टिस्टेट बँकेचे शाखा अधिकारी गजानन हलगे, अनिल चौधरी, काशीनाथ सरवदे, संदीप चौधरी, शिवा बडे, बालासाहेब चाटे, प्रवीण रोडे, संतोष कांबळे, बाबुराव ठोके आदी उपस्थित होते.
[ad_2]