उरण तालुक्यात अवैध पार्किंग बंद करण्याची मागणी

0

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस जड – अवजड वाहनाची संख्या सुद्धा अधिक प्रमाणात वाढली आहे. ही वाहने जेएनपीए बंदरामध्ये माल खाली झाल्यानंतर सर्व्हिस रोडवर अवैध पार्क केली जात आहेत. सदर वाहनांवर वाहतुक पोलिस दैनंदिन दंडाची कारवाई करून ती वाहने संबंधित जागेतून काढुन घेतली जातात. परंतु सिडको प्रशासनाकडून अधिकृत पार्किंग उपलब्ध नसल्याने सदर वाहने ही इतर ठिकाणी पुन्हा पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी अपघातांचे प्रकार होतात.

उरण तालुक्यातील वाहतुक कोंडी समस्या सोडविण्यासाठी सिडकोच्या वतीने पार्किंगच्या नियोजनासाठी ५ प्लॉट राखीव ठेवण्यात आलेले ५ राखीव प्लॉट लवकरात लवकर विकसित करण्याची मागणी सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे.याबाबत उरण वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्याशी संपर्क केला असता उरण वाहतुक शाखेमार्फत अवैध पार्किंग केलेल्या वाहन चालकांवर दैनंदिन कारवाई करण्यात येत आहे. मागील वर्षभरात सुमारे २२ हजार अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदर वाहन चालक यांना टीआयपीएल कंपनीच्या पार्किंगमध्ये वाहने पार्किंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सिडको प्रशासनाने पार्किंग करीता राखीव ठेवण्यात आलेले भूखंड लवकरात लवकर विकसित करावे याबाबत वारंवार सिडकोकडे पत्रव्यवहार कारण्यात आला आहे.असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here