[ad_1]
.

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवावर महानगरात मंगळवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. खोलेश्वर येथील परशुराम चौकातून परशुराम जन्मोत्सवाची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.
या शोभायात्रेचा प्रारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी यांच्या हस्ते व आयोजन समितीचे विजय तिवारी, अशोक शर्मा (लोणाग्रा) मोहन पांडे, अॅड. सत्यनारायण जोशी, भरत मिश्रा, राजेश शर्मा, अनिल थानवी, कृष्णा शर्मा, राजेंद्र तिवारी, डॉ. के. ओ. शर्मा, रामरतन शर्मा, डॉ. आनंद शर्मा, संतोष बबेरवाल, सिद्धार्थ शर्मा, रामप्रकाश मिश्रा,ॲड. सुशील शर्मा, विष्णुदत्त शुक्ल,डॉ दीपक केळकर, उदय महा, अमोल चिंचाळे, हेमेन्द्र राजगुरू, हितेश मेहता आदींच्या उपस्थितीत भगवान परशुरामचे पूजन होवून प्रारंभ झाला. बँडबाजाच्या गजरात, आतिषबाजी करीत अनेक देखावे व झाकी समवेत ही शोभायात्रा खोलेश्वर, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, कपडा बाजार चौक, जैन मंदिर, गांधी चौक, तहसिल कार्यालय, वसंत टॉकीज, वर्धमान भवन मार्गे भगवान परशुराम चौकात सामूहिक आरतीने समारोप करण्यात आला.
या शोभायात्रेत भगवान परशुराम यांचा देखावा, गुजराती ब्रह्म समाजाची शंकर पार्वतीचा देखावा आदी साकार करण्यात आले होते. दरम्यान या शोभायात्रेचे माहेश्वरी समाज ट्रस्ट, शिवसेना शिंदे गट, शंकर शर्मा, सिटी कोतवाली चौकात खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने यांनी तर गांधी चौकात आ. साजिद खान पठाण, खरोटे ज्वेलर्स समवेत अनेक मंडळ, संस्थांनी स्वागत केले. दरम्यान सिव्हिल लाईन परिसरातून भव्य मोटरसायकल रॅली मराठी ब्राह्मण युवा संघटनेच्या वतीने काढण्यात आली. शोभायात्रेचे समापन परशुराम चौकात करण्यात आले. रात्री मा. ब्रा. संस्कृत विद्यालयात आयोजित महाप्रसादाचा शेकडो समाज बांधवांनी लाभ घेतला. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भगवान परशुराम जयंती निमित्त खोलेश्वर स्थित भगवान परशुराम चौकामध्ये श्यामसुंदर शर्मा यांच्या उपस्थितीत महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
[ad_2]