[ad_1]
OnePlus 15 : OnePlus लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 13s लॉन्च करणार आहे. हा फोन अॅमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. OnePlus 13s हा OnePlus 13 चा एक कॉम्पॅक्ट एक छोटं व्हर्जन आहे. याच दरम्यान, OnePlus च्या पुढचा फोन OnePlus 15 संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंपनी OnePlus 13 नंतर 14 न आणता थेट OnePlus 15 लॉन्च करण्याच्या तयारीतल आहे.
OnePlus 15 चे संभाव्य फीचर्स:
चिनी टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने OnePlus 15 बाबत काही डिटेल्स शेअर केल्या आहेत. या फोनमध्ये 6.78 इंचाचा 1.5K LTPO डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यामध्ये 50MP चा मेन कॅमेरा आणि 50MP चा पेरिस्कोप कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याचा कॅमेरा मॉड्यूल OnePlus 13 सारखाच असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसर मिळू शकतो. या प्रोसेसरमुळे परफॉर्मन्समध्ये मोठा अपग्रेड अपेक्षित आहे.
OnePlus 13 ची थोडक्यात माहिती…
OnePlus 13 यावर्षीच्या सुरुवातीला भारतात लॉन्च झाला होता. यामध्ये 2K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि अल्ट्रो स्लिम बेजल असणार आहे. तर Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज सपोर्ट आहे. आता येणाऱ्या अर्थात अपकमिंक फोनच्या स्टोरेज पासून बॅटरीपर्यंक अपग्रेट पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : ‘लोक रेकॉर्ड्स आणि यश मिळवलं त्याविषयी बोलतील, पण…’; विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनुष्काची भावनिक पोस्ट
या फोनच्या बॅटरी विषयी बोलायचं झालं तर यात 6,000mAh ची मोठी बॅटरी, 100W वायर्ज फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग आहे. OnePlus 15 मध्ये यापेक्षा मोठी सिलिकॉन-नॅनो स्टॅक बॅटरी मिळू शकते. याशिवाय, फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसोबत येऊ शकतो. थोडक्यात, OnePlus 15 मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसर अशा अनेक बाबतीत मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे आता या फोनच्या लॉन्चकडे टेक लव्हर्समध्ये चांगलाच उत्साह वाढला आहे.
[ad_2]