नाती ../ ए आय शेती ..

0
download (3).jpg

सतावे  वृध्दापकाळ

सैल  पडतात  नाती

मुले बाळी  दुरावती

रुंजी घाले नातनाती

दुर्धर आजार अनेक 

जन्मांतरीचे  सोबती

मृत्यूला बिलगे पर्यंत

राही एकनिष्ठ संगती

रक्ताची नाती  निसटे

स्पष्टदिसते विसंगती

ऐश्वर्य जवळ असता

कशा  रंगतात पंगती

वाढा मिठान्नं पानांत

गप्पाटप्पा त्या दंगती

हातांमधे दानतशक्ती

आशीर्वाददेण्यापुरती

आधारशोधण्यास्तव

चिमणीपोरे बिलगती

होता स्वयंभू  सशक्त 

नकळत ती विलगती

रुळासहीत गाडीवळे

कसे पहा  सहजगती 

हरित पीत पाने भिन्न

नियम हाच  रे जगती

गरज आता संपलेली

केली  जाते  निनंगती

विसरून  जाती लोक

होती जशी अस्तंगती

ए आय शेती ..

ए आय तंत्र ज्ञान ते

आता येणारं शेतीत

नव चैतन्य रूजवले

रे आता मायमातीत

प्रतिक्षा सरत आली

आश्वासने ये कृतीत

सदैव संकटे पिडला

शेतकरी  हो व्यतिथ 

गारपीट अतिव वृष्टी 

दुष्काळ  पूर कथीत

कसा सोडवावा गुंता

वाटत होते प्रश्नातीत

अंदाज येई संकटांचा 

कायघडणार आक्रीत

यशस्वीकराल सामना

होण्या आधी विपरीत 

सकसबियाणे न् खते

जातीनवीन विकसित 

अभ्यासपूर्ण पेर होता

पीके  उभारे उल्हसित

हवे आँनलाईनमार्केट

फायदामिळेल खचित 

क्षणार्धां सौदे बोटावर

हमीभाव प्राप्त उचित

स्वता बदलू भाग्यरेषा 

नवीन तंत्रज्ञानासहीत

यशवंत हो  बळीराजा 

काळ नोंद घेई  वहीत

– हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here