[ad_1]
वादळी वारे, मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे जीर्ण झालेली वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे. वाळूज, साजापूर, वडगाव परिसरातील औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा तब्बल २० ते २४ तास बंद राहिला. यामुळे उद्योजकांना प्रचंड नुकसान सहन करावे ला
.
पावसाळ्यात अखंडित विजेसाठी महावितरणकडून मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे केली जातात. या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाळूज, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, शेंद्रा परिसरातील वीज पुरवठा खंडित होत आहे. गट नंबर, चिकलठाण परिसरातील वेगवेगळ्या भागात बुधवार ते शुक्रवार यादरम्यान वेगवेगळ्या भागात २० ते २४ तास वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे वडगाव, साजापूर, के, एल, एम. सेक्टर व चिकलठाण्यातील उद्योजकांनी महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्या कार्यालयात जाऊन तीव्र संताप व्यक्त केला.
अखंड विजेसाठी प्रयत्न
वाळूज, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन व शेंद्रा एमआडीसीमधील उद्योगांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी पावसाळ्यात महावितरणचे मनुष्यबळ व यंत्रसामग्रीसह २४ तास सेवेसाठी फिरती वाहन सेवा दिली जाणार आहे. औद्योगिक ग्राहकांची तक्रार येता कामा नये, असे निर्देश दिले आहेत. रोहित्रांची क्षमता वाढ, ३३ केव्ही उपकेंद्र निर्मिती, पुरेसे मनुष्यबळ पुरवणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याचा प्रयत्न आहे. – धनंजय औंढेकर, सहव्यवस्थापकीय संचालक
वीज नाही, ही शोकांतिका
औद्योगिक ग्राहक १०० टक्के वीज बिल भरणा करतात. त्यामुळे अखंडित वीज सेवा मिळायला हवी. प्रत्यक्षात २४ तासांपर्यंत वीज मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. – चेतन राऊत, माजी अध्यक्ष, मसिआ
अतोनात नुकसान
विजेअभावी हजारो कामगार बसून असतात. उत्पादन थांबून आर्थिक नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीत वीज गेल्यानंतर ती पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडे पुरेशी यंत्रणा नाही.यात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा उद्योजकांना तीव्र आंदोलन करावे लागेल. – अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ
येत्या सोमवारी बैठक
मसिआ, सीएमआयच्या नेतृत्वात औद्योगिक ग्राहकांनी २२ मे रोजी महावितरणचे कार्यालय गाठून सहव्यवस्थापकीय संचालक औंढेकर यांच्यासमोर वीज समस्यांचा पाढा वाचला. या पार्श्वभूमीवर औद्योगिक ग्राहक समस्यांबाबत सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
[ad_2]