[ad_1]
छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. यानंतर एसीबीने उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले आहे. लाचखोर विनोद खिरोळकरच्या
.
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या कामासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करायची होती. ती करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे 41 लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील 23 लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. मात्र, तरीही 18 लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आज एसीबीने त्यांना रंगेहात अटक केली. अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन मार्फत ही लाच घेण्यात येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच एसीबीने लाचखोर खिरोळकरच्या घरी धाड टाकून मोठा ऐवज आणि रोकड जप्त केली आहे.
घरातून एवढा मोठा ऐवज सापडला
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद खिरोळकर यांच्या घरातून तब्बल 13 लाख 06 हजार 380 रुपयांची रोकड, 50 लाख 99 हजार 583 रुपयांचे 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोन्याचे दागिने, तसेच, 3 लाख 39 हजार 345 रुपय किमतीचे 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, यांसह इतर काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
एसीबीला काय सापडले?
- रोख रक्कम : 13 लाख 6 हजार 380
- सोने (589 ग्रॅम / 59 तोळे) : 50 लाख 99 हजार 583
- चांदीचे दागिने (3.5 किलो) : 3 लाख 39 हजार 345
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांवर एसीबीने कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यात देखील महिला क्रीडा अधिकारीलाही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून दिलीप त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.
[ad_2]