[ad_1]
How To Prevent Pimples In Monsoon: पावसाळा म्हणजे दमट हवामान, वाढलेली आर्द्रता आणि बॅक्टेरियांच्या वाढीस अनुकूल वातावरण. याचमुळे या हंगामात त्वचेच्या समस्या, विशेषतः मुरुमे अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. पावसाळ्यातील बदललेले हवामान, चेहऱ्यावरील घाम, तेल, धूळ आणि ओलसरपणा यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण अडकते आणि मुरुमांची उत्पत्ती होते. यावर मात करण्यासाठी या काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.
पावसाळ्यात मुरुमांपासून बचावासाठी हे उपाय करा
1. नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता
पावसाळ्यात चेहऱ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक गोष्ट आहे. दिवसातून किमान दोन वेळा पीएच बॅलन्सिंग क्लीन्सर वापरा. जो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकेल आणि छिद्रे बंद होण्यापासून थांबवेल.
2. एक्सफोलिएशन
आठवड्यातून एक ते दोन वेळा सौम्य एक्सफोलिएटरचा वापर करा. यामुळे मृत पेशी हटून त्वचा श्वास घेऊ लागते. कठोर स्क्रब टाळावे कारण हे त्वचेचे नुकसान करू शकते.
3. आहारात सुधारणा
तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूड हे पावसाळ्यात मुरुमांना अधिक आमंत्रण देतात. त्याऐवजी ताज्या फळांमध्ये लिंबू, पपई, काकडी, टोमॅटो यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंटयुक्त अन्न त्वचेसाठी लाभदायक ठरते.
4. हायड्रेशन
पावसाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी प्यायले जाते, पण ही सवय त्वचेसाठी घातक ठरते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.
5. मेकअप टाळा
पावसाळ्यात मेकअप वापरणे टाळा किंवा हलका मेकअप वापरा. मेकअप करताना ही काळजी घ्या की तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होणार नाहीत.
6. चेहऱ्याला वारंवार हात लावू नका
पावसाळ्यात आपण अनेकदा बाहेर जातो तेव्हा अनेक सुक्ष्मजीव आपल्या हातांना लागतात. चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने बॅक्टेरिया त्वचेत प्रवेश करतात आणि मुरुमे होतात.
होममेड फेसपॅक वापरा
1. मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. हा पॅक अँटीबॅक्टेरियल असून मुरुमांवर नियंत्रण ठेवतो.
2. चंदन आणि गुलाबजल एकत्र करुन लावल्याने चेहरा थंड राहतो आणि डाग कमी होतात.
3. बेसन आणि हळद नैसर्गिक क्लिंजर म्हणून उत्तम आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा नक्कीच वापरले पाहिजे. हा पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी एकदा पॅचटेस्ट करणे महत्त्वाचे आहे.
पावसाळा कितीही सुंदर वाटत असला तरी त्वचेसाठी ही वेळ सावधगिरीची असते. मुरुमांना दूर ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता, योग्य आहार, भरपूर पाणी आणि नैसर्गिक उपाय हेच आपले संरक्षण कवच आहे. त्वचेला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आजपासूनच हे उपाय अमलात आणा.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)
[ad_2]