उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )
श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने उरण तालुक्यातील आदिवासी कातकरी पिरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.तसेच महिला व लहान मुलांचे चेकअप देखील करण्यात आले व मोफत औषधे वाटण्यात आली. ३८ जणांनी वैद्यकीय तपासणी चा लाभ घेतला.शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर,समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था कार्याध्यक्ष संगीता ढेरे( रायगड भूषण ) कविता म्हात्रे ,पूजा प्रसादे, मीना रावल, विशाखा म्हात्रे,अनघा ठाकूर, रश्मी तांबे, सीमा निकम, सुमन ताई तोगरे, तृप्ती भोईर, श्रेया ठाकूर, योगेश म्हात्रे, उमेश वैवडे , सचिन ढेरे,केशव निकम, दिनेश हळदणकर,अमर ठाकूर, आनंद ठक्कर ,घनश्याम भोईर, सुभाष पाटील, संग्रामकाका तोगरे, दीपक प्रसादे या सर्वांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असून या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.