अनिल वीर सातारा : भारतीय बौद्ध महासभा,शाखा- पाटण तालुका यांच्या विद्यमाने तालुक्यातील सर्व विभागात वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यासाठी बोधिसत्व बुध्द विहार,पाटण येथे तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे माजी केंद्रिय सचिव एन एम आगाणे (काका) यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन करण्यात आले.यावेळी पदाधिकारी, उपासक व उपासिका उपस्थीत होत्या. वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन आषाढ पौर्णिमा गुरुवार दि. १० रोजी सकाळी ११ वा. बोधिसत्व बुध्द विहार, पाटण येथे होणार आहे .
तेव्हा पाटण तालुक्यातील सर्व विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि बौध्दाचार्य, माजी श्रामणेर,केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक दलाचे जवान, उपासक, उपासिकांच्या उपस्थितीत धम्म मंगल वातावरणात प्रारंभ होणार आहे.तद्नंतर प्रत्येक विभागातील सर्व गावात फिरती प्रवचन मालिका राबविण्यात येणार आहे. एकूण १९ विषयावर सखोल अभ्यास करुन तथागत भगवान बुध्दाचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती आणि त्यामुळे आपले आयुष्य सुवर्ण झळाळी सारखे चमकदार झाले आहे. त्याची ओळख, जाणिव आणि परिवर्तन घडविणारे विचार प्रवचनकार जनमानसात रुजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.अशी माहिती सरचिटणीस घन:शाम विश्वनाथ कांबळे यांनी दिली.