सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाशी सेवानिवृत्त शिक्षक आजही कायम : ॲड.जाधव

0

 नांदेड प्रतिनिधी :- सेवादास परिवारातील सदस्य सेवानिवृत्त होत असले तरीही आमच्या कुटुंबातील सदस्य जबाबदारी मुक्त झाले असले तरीही ते कायम आमच्या सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाला  जोडले गेले असल्याचे सांगून अध्यापन साठी दैनंदिन शाळेत यावे असे विनंती संस्थेचे कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव यांनी केले. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल सिडको येथील सह शिक्षक सुर्यभान मोरे व महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे अशोक निवळे हे प्रदिर्घ सेवेनंतर 30 जुनं 25 रोजी सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव .सदस्य निलम जाधव,भाग्यश्री जाधव, यांच्या सह मुख्याध्यापक एस.जी.शेख  व संजय कानोटे व महात्मा गांधी बि एड महाविद्यालय सिडकोचे प्राचार्य घुले यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सेवापुर्ति सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी प्राचार्य घुले यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करावे असे मनोगत व्यक्त केले.तर सहशिक्षक राऊत यांनी आपल्या भाषणातून सेवा काळात केलेल्या कार्याची उल्लेखनिय माहिती देऊन आठवणीना उजाळा दिला. निरोप सोहळ्यात मोरे यांनी सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव व पदाधिकारी यांचे आभार मानले तर निवळे यांनी महात्मा गांधी प्राथमिक शाळेत गुणवत्ता वाढीसाठी सह शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

या सोहळ्याला भाऊराव मोरे,माजी सरपंच दता पाटील मोरे,राजु मोरे,काळबा मोरे,संदीप मोरे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन एन.एस. ढवळे यांनी केले,या सोहळ्याला माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद व परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील विध्यार्थ्यांना सेवानिवृत्त निमित्ताने दोन्ही शिक्षकांनी शालेय साहित्य वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here