नांदेड प्रतिनिधी :- इंदिरा गांधी हायस्कूल सकाळ विभाग व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको तर्फे इंदिरा गांधी हायस्कूलच्या उपमुख्याध्यपिका सौ.महाराज यांना भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालय देगाव-येळेगाव,येथे मुख्याध्यपाक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल इंदिरा गांधी हायस्कूल चा सकाळ विभाग व प्राथमिक शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शाळेतील जेष्ठ शिक्षक के.आर.येवते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसगी शाळेचे मुख्याध्यापक जी. एम.शिंदे, प्राथमिकच्या मुख्याध्यपिका शिंदे,जेष्ठ शिक्षक एम.टी.कदम, कल्याणकर,सर्व शिक्षक उपस्तित होते शिक्षेकेतर कर्मचारी स्वामी बाई यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले, शाळेतील क्रीडा शिक्षक सूर्यवंशी व क्रीडा विभागातर्फे सत्कार केला,सर्व शिक्षकांनी मनोगत मांडून सौ.महाराज व येवते यांना शुभेच्छा दिल्या.