मी राजर्षी शाहू महाराज बोलतोय…एकपात्रीप्रयोग संपन्न !

0

अनिल वीर सातारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सवनिमित्त येथील लुंबिनी संघ या सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे अभिवादनपर वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय,कुमार आहेर यांनी वेशभूषेत, “मी लोकराजा राजर्षी शाहु महाराज बोलतोय !” हे एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला.

    इ. 6 वी ते 8 वी: राजर्षी शाहू महाराज जीवन परिचय या विषयासाठी बक्षीसे प्रथम क्र. रु.500/-, द्वितीय क्र. रु.300/- व तृतीय क्र. रु.200/- अशी होती.इ.9 वी व 10 वीसाठी राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य यासाठी  प्रथम क्र. रु.500/-, द्वितीय क्र. रु.300/- व तृतीय क्र. रु.200/- अशी बक्षिसे होती..इ. 11 वी व 12 वीसाठी राजर्षी शाहू महाराज एक क्रांतीकारक या विषयासाठी प्रथम क्र. रु.700/-, द्वितीय क्र. रु.500/- तृतीय क्र. रु.300/- अशी बक्षिसे होती.

 

खुलागट: राजर्षी शाहू महाराज लोकशाहीचे आद्य प्रवर्तक यासाठी प्रथम क्र. रु.1,000/- द्वितीय क्र.रु. 700/-, तृतीय क्र. रु.500/- अशी बक्षिसे होती. वक्तृत्व स्पर्धेच्या प्रत्येक गटातील क्रमांकांना बक्षिसासह शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आली.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.

               सदरच्या स्पर्धा येथील एज्युकेशन सोसायटीचे अनंत इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाल्या होत्या.आहेत.याकामी,डॉ.गोरख बनसोडे – अध्यक्ष (9970937308),प्रताप माने (9975727598),सुरेश मुळीक – सचिव (987015520),सौ. वैशाली बनसोडे (7666226493),प्रदिप मस्के – कोषाध्यक्ष (9766656515) व सौ. सुचिता कांबळे यांनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here