माजी नगरसेवक कुमार शिंदेच्याकडून मठाच्या बांधकामास रु.पाच लाख मदत

0

महाबळेश्वर (प्रतिनिधी )-महाबळेश्वर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपुर येथे बांधण्यात आलेल्या मठाचे काम निधी अभावी अर्धवट स्वरूपात आहे . महाबळेश्वर तालुक्यातील वारकरी मंडळाचे कार्याध्यक्ष व त्यांचे सहकारी कोंडीराम ढाणक (बुवा ) व पांडुरंग सपकाळ सी.डी.बावळेकर यांनी दातृत्वासाठी सर्वश्रुत असलेले माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्याशी संपर्क करून मठाच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले 

. त्यानूसार  आषाढी एकादशीचे औचित्य साधून काल पंढरपूर येथील महाबळेश्वर तालुक्याच्या वारकरी मंडळाच्या मठाला भेट देऊन या मठाच्या बांधकामाला पाच लाख रूपयांची मोठी आर्थिक मदत केली या वेळी माजी नगरसेवक संतोष शिंदे , प्रशांत आखाडे, अजय कांबळे, विशाल जगदाळे अशोक सपकाळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here