अनिल वीर सातारा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेजच्या अभ्यासकेंद्रात वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत विष्णू ढेबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना शेकडा 81.25 गुण मिळवून विशेष प्राविण्यासह त्यांनी हे यश संपादन केले आहे.
याकामी, जयंत लंगडे, मधुसूदन पत्की यांचे मार्गदर्शन लाभले. विष्णू ढेबे यांनी यापूर्वीही बारावी, बी. ए., डी. एड. व बी. एड या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकाचे यश संपादन केलेले आहे.या यशाबद्दल केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम,दगडू ढेबे, संजय पारठे,विनायक पवार,नामदेव धनावडे,विस्ताराधिकारी सुरेंद्र भिलारे, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे व आनंद पळसे तसेच संतोष आप्पा जाधव, संपतभाऊ जाधव,संजय गायकवाड,प्रविण भिलारे, राजेंद्रशेठ राजपुरे आदी मान्यवर, ग्रामस्थ मंडळ चिखली व देवळीमुरा यांनी अभिनंदन केले आहे.