फुंडे विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

0

उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )

रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे बी.बी.यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील एच.एन.यांनी केले.त्यानंतर विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू ,प्राचार्य साळुंखे बी.बी.,उपमुख्याध्यापिका थोरात एस.डी. ,पर्यवेक्षिका बाबर एस.एम. व पाटील एस.एस. वरिष्ठ लेखनिक नितीन म्हात्रे व उपस्थित सर्व गुरुजनांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी विद्यालयातील आदर्श व गुणी विद्यार्थिनी राधिका खामकर हिला इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.

            या प्रसंगी स्वराज पवार, आयुष मोरे, कु.श्रावणी तेलंगे, सरस्वती पवार,अनुष्का भिलारे, यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शेळके आर.जी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या भारतीय संस्कृतित गुरूची महती फार वर्षापासून गाइली आहे.गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर, यशस्वी जीवनात वाटचाल करण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी गुरूची आवश्यकता असते.विविध उदाहरण देत आपले मनोगत सांगितले. या मंगलमय सोहळ्याचे नियोजन इ.१० वी क च्या वर्गाने व वर्गशिक्षिका जितेकर के.एम.यांनी केले.या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीनिती भोईर व आभार साक्षी मेटकरी हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here