एस. एस. जी. एम. महाविद्यालयास नॅक समितीची भेट…..
कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयास नॅक समितीने नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या समितीत चेअरपर्सन प्रो. झक्केरीया के. ए. (केरळ), समन्वयक सदस्य प्रो.नारायणन राजू (तामिळनाडू), सदस्य प्रि.डॉ.संजयकुमार पांडे (उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. तीन सायकल पूर्ण करून चौथ्या सायकलला जात असलेल्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयाची पाहणी करताना समितीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलेले सादरीकरण, IQAC समन्वकांचे सादरीकरण,विभागप्रमुखांनी विभागांचे केलेले सादरीकरण पाहण्याबरोबरच संस्था पदाधिकारी, विभाग प्रमुख, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विविध समिती प्रमुख यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला.
सदर भेटीत समितीने राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. विभाग, कमवा व शिका योजना, विद्यार्थी विकास मंडळ, वनस्पती शास्त्रीय उद्यान, आरोग्य केंद्र, योग केंद्र, इनोव्हेशन अॅण्ड इंक्लूबेशन सेल, संगणक विभाग, अतिथिगृह, डिजिटल ग्रंथालय, इन डोअर व आउटडोअर गेम सुविधा असलेला जिमखाना, प्लेसमेंट सेल, करिअर कौन्सिलिंग सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, लँग्वेज लॅब, अपंगांसाठीचे रॅम्प असेंबली पॉईंट, कर्मवीर प्रदर्शन दालन अशा विविध स्थळांना तसेच, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, ई.टी.पी. प्लांट फॅसिलिटी, बायोगॅस प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली. सायंकाळी समितीने, विद्यार्थ्यांनी कलागुणांचा आविष्कार घडविलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही मनमुराद आस्वाद घेतला.
३० व ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या या नॅक समिती भेटी दरम्यान महाविद्यालयाचा परिसर हिरवी वनराई, दिशा दर्शक व संदेश दर्शक फलक यांनी सुशोभित होण्याबरोबरच, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती व लगबगिने गजबजून गेला होता. सर्वच घटकांच्या चेहऱ्यावर औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासा, प्रसन्नता इत्यादी भाव संमिश्रतेने फुलून आलेले दिसत होते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाला उत्तम गुणांसह उच्चतम मानांकन मिळण्याचा विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र तरीही, सर्वच घटकांना नॅक समितीकडून मिळणाऱ्या मानांकनाची प्रतीक्षा आहे.
सुरक्षा सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना सुरक्षा माहितीसह शालेय वस्तूचे वाटप.
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : सुरक्षा सप्ताह निमित्ताने उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या पीएसए अमेया कंपनी मार्फत खोपटे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना...
एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये ‘महसूल सप्ताह युवा संवाद’ आणि ‘नवीनमतदार जनजागृती’ कार्यक्रम संपन्न…..
कोपरगाव- महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस 'महसूल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्याविविध योजनांची अधिकाधिक...
येवल्यातील सई तिदार चा राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक
येवला, प्रतिनिधी :
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेसुकी शाळेतील विद्यार्थिनी सई तिदार हिने राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात डंका गाजवला आहे. केवल...
भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या दलालांना ए .सी .बी च्या ताब्यात द्या :आमदार किशोर दराडे
नाशिक प्रतिनिधी : चुकीची कामे करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना व त्यांच्या दलालांना ए .सी .बी च्या ताब्यात द्या अशा शब्दात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी...
सावरगाव विद्यालयात शेती कामाची जवाबदारी पेलवत शेतकरी कन्यांची गरुडभरारी!
निकाल ९२ टक्के : पायल काटे,आरती काकड प्रथम,नांदूरची अश्विनी सोनवणे द्वितीय क्रमांक
येवला, प्रतिनिधी :
जिद्द,शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते..हे या ग्रामीण...
पाताळेश्वर विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
वृक्ष संगोपन ही काळाची गरज_
सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारात,परिसरात जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून वृक्ष लागवड केली बाल विज्ञान विकास...
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात‘शांतता पुणेकर वाचत आहे’ उपक्रम उत्साहात साजरा
कोपरगाव - रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रंथलय, कमवा व शिका...
शिक्षकाना त्यांच्या हक्काचे पैसे मिळेना ; नाशिक जिल्ह्यातील शिक्षक आले मेटाकुटीला
सिन्नर : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांना निवेदन गेल्या सात वर्षांपासूनची ६४ कोटीची बीले मंजुर होऊन निधी अभावी पडून...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘जागतिक ओझोन दिन’ संपन्न
हडपसर: 17 सप्टेंबर 2023.प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये 'भूगोल विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग, आणि आय.क्यू.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक ओझोन दिन'...