खारघर कार्यक्रमाची चौकशी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी – शरद पवार

0

मुंबई : खारघर कार्यक्रमाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज (21 एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, “खारघरचा कार्यक्रम हा राज्यसरकारचा होता. त्याच्या नियोजनाची जबाबदारीही त्यांची होती. इतक्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. उष्माघातामुळे लोक मृत्युमुखी पडले.”

“ठोस आकडा कोणाला माहिती नाही. कोणी 10 म्हणतं कोणी 15 तर कोणी 26 म्हणत आहेत. सरकारला इतकी गर्दी जमवून आगामी निवडणूकीसाठी अनुकूल वातावरण तयार करायचं होत? त्याची किंमत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मोजावी लागली. “या संपूर्ण प्रकरणाची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी झाली पाहीजे आणि संपूर्ण परिस्थिती देशासमोर आली पाहीजे,” असं पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here