राजूरमध्ये रविवारी भरदिवसा कुऱ्हाडीने वार करून खून

0

जालना प्रतिनिधी : राजूर मध्ये रविवारी भर दिवसा कुऱ्हाडीने वार करून एकाचा निर्घृण खून करण्यात आला . भर बाजारात खून झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजूरच्या आठवडी बाजार लगतच दिवसाढवळ्या खून होत असल्याने मारेकऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही .

राजूर-चनेगाव रस्त्यालगत असलेल्या आठवडे बाजारपेठ जवळ असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन ,तीन जणांनी कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मयत झालेल्या व्यक्तीचे नाव गोरक्षनाथ आत्मराम कुमकर असून चनेगाव रोड वरील गोरक्षनाथ यांच्या घराचे बांधकाम दोन, तीन  महिन्यापासून सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी गोरक्षनाथ कुमकर थांबले असता तोंडाला रुमाल बांधून आलेले अनोळखी दोन ,तीन व्यक्तीने त्यांच्या सोबत हुजत घातली .त्यानंतर बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत होऊन गोरक्षनाथ कुमकर यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात दोन-तीन वार करण्यात आले . त्यात कुमकर यांचा जागीच मृत्यू झाला .आणि मारेकरी घटनास्थळवरून फरार झाले .

रविवारी आठवडी बाजार असल्याने हा बाजार चनेगाव रोड लगत आहे. त्यामुळे या ठिकाणी खूप वर्दळ असते .या वर्दळीचा फायदा घेत मारेकऱ्यांनी कुमकर यांचा खून केला . या खुनामागे प्लांट किंवा जमिनीच्या वादातून झाल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. 

घटनेची माहिती मिळताच सपोनि वैशाली पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजूरच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .तर कुमकर यांच्या मारेकऱ्याना जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत मुतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुमकर यांच्या नातेवाईकांनी घेतली होती . उपविभागीय अधिकारी ईदल सिंग बहुरे यांनी भेट दिली. राजूर  पेट्रोलपंप परिसरात मारेकऱ्यांनी  खुनासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी  ताब्यात घेतली. तसेच मारेकरी आरोपीना लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन मयताच्या नातेवाईकांना दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here